दोन कविता

एक वेळ

उन्हाळ वेळेला
शर्यत लावत असतात तुमच्या सावल्या  तुमच्याबरोबर
आणि वाट पहात असता
विसाव्याची.

पिळून टाकायचा असतो माथ्यावरचा सूर्य
झाडुन टाकायची रखरख.
आणि लटकवुन द्यायचाय
त्याला डेरेदार आंब्याच्या झाडावर.

शिंपडता पाणी तुह्मी  रखरखत्या आभाळावर
येणार असते कुणी
चार एक वाळवंटं ओलांडून
पाच सहा समूद्र लांघून
वाट पहात असता
शिडाची.

गच्च भरलेला डबा
उघडू पहाता
नखं घालून उचकटू पहाता
टोपणाची घट्ट मिठी.

संभ्रमाने झाकोळलेल्या
आकाशा्वर
शंकेखोर जमीनीवर
सडा टाकून
रांगोळी रेखाटण्याची वाट पहाता.

एक वेळ.

विसाव्याची.
शिडाची.
टोपणाच्या उडण्याची.
संभ्रमाच्या ग्रहणाची.
रांगोळी रेखाटण्याची.

-----------------

रात्र: एक टिपण

भरलेली रात्र
ओसंडून वाहात असते.
दुकाने थाटून असतो
ड्रींंमाळलेला मालक गि-हाईकांची वाट बघत.

अंथरलेला दिवस
घोरत असतो
शिणले उदगार.
पांघरुणाला ओढून घेतात
नको असणा-या आठवणी.
घाम आणणा-या स्वप्नांना लांघण्यासाठी
कूस बदलतो चिकट तळवा.
आढ्यावरली पाल चुकचूकत राहाते
वॉटस अ‍ॅपच्या मेसेजसमधून.

आपण घेणार असतो हग
देणार असतो किस
ती फ़ेकणार असते पॅंटी.
चढलेल्या रात्रीत  गर्दी बेभान होते
बारच्या टेबलाभोवती.
त्याचा शब्द तो ऐकतो
तिचा सुस्कार तो सोडतो
त्याची शिवी ती हासडते
त्याचा खारा दाणा तिच्या कानात
तिचा मेन्यू त्याच्या वाट्याला
त्याचा रिंगटोन ती ऐकते
फ़ेसबूकची मिठी वॉट्स अ‍ॅपला.
क्लिका क्लिकी
किका किकी.
भरलेली रात्र ओसंडून
वाहात असते.

पहाटेचा चौक
शोधत राहातो
चुकल्या माकल्या
उतल्या मातल्या
दिशांना.
 -----------------------------

Comments